By  
on  

पुन्हा एका पंतप्रधान मोदी यांच्यावर बायोपिक, गजेंद्र चौहान साकारणार भूमिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणखी एक बायोपिक येऊ घातला आहे. 'एक और नरेंद्र' असं या सिनेमाचं नाव आहे. अभिनेते गजेंद्र चौहान हे या सिनेमात पंतप्रधान मोदींच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाच्या एका भागात स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा असेल तर दुस-या भागात मोदींचा जीवनक्रम दाखवला जाईल.

मिलन भौमिक हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. 12 मार्च पासून सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होईल. येत्या सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive