By  
on  

रणबीर कपूर करोना पॉझिटीव्ह, आई नीतू कपूर यांनी दिली माहिती

करोना विषाणूशी भारतीयांची झुंज अद्याप सुरुच आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत त्याच्या विळख्यातून कोणीच वाचू शकलेलं नाही. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, जेनेलिया डिसूझा अर्जुन कपूर, नीतू कपूर, मलायका अरोरा, कनिका कपूर अशा अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली होती. या यादीत आता रणबीर कपूरच्या नावाचा समावेश झाला आहे. 

नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत रणबीर कपूरची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी लिहिलं, तुम्ही सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीसाठी आणि दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. रणबीरची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. रणबीरला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं असून आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive