By  
on  

प्रभासच्या 'आदिपुरुष'मध्ये आता झळकणार ही अभिनेत्री, दिसणार सीताच्या भूमिकेत

'तानाजी: द अनसंग वारियर' या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊत आता प्रभाससोबत 'आदिपुरुष' हा सिनेमा घेऊन येतोय, ज्याची सध्या बरीच चर्चा आहे. या सिनेमात अभिनेत्री कोण झळकणार याविषयी बरीच चर्चा होती. मात्र आता या सिनेमासाठीच्या अभिनेत्रीचा शोध पूर्ण झाला आहे. बऱ्याच काळापासून या सिनेमाच्या अभिनेत्रीसाठी शोध सुरु होता आणि आता हा शोध पूर्ण होऊन अभिनेत्री कृती सेननच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक ओम राऊतने याविषयी घोषणा करत कृतीचं स्वागत केलं आहे. शिवाय कृतीनेही पोस्ट करून आदिपुरुषचा भाग झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. या सिनेमात अभिनेता प्रभास हा श्री रामांच्या रुपात तर रावणच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. तर आता कृती सेनन सीताच्या भूमिकेत झळकणार आहे. 

 कृती सेनन ने ट्विट करून लिहीलं की, "एका नवीन प्रवासाची सुरुवात, आपल्या प्रिय लोकांसोबत. आदिपुरुष चा भाग बनून आनंदी आहे." यासोबतच अभिनेता सनी सिंहदेखील या टीममध्ये सहभागी झाला आहे. या पोस्टमध्ये काही फोटोही शेयर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये क्रिती सेनन, प्रभास, ओम राऊत आणि सनी सिंह पाहायला मिळत आहेत.

 

या सिनेमाविषयी अशी बातमी आली होती की या सिनेमात हेमा मालिनी यांचीही एन्ट्री झाली आहे. हेमा या 'आदिपुरुष' सिनेमात कौशल्याच्या भूमिकेत दिसणार आहे असं बोललं जातय. मात्र याविषयी कोणतीच अधिकृत माहिती सिनेमाच्या टीमकडून घोषीत करण्यात आलेली नाही. या भव्य सिनेमाची निर्मिती भूषण कुमारचे टी सीरीज आणि ओम राऊत करत आहेत. आदिपुरुष हा सिनेमा 21 ऑगस्ट, 2022 रोजी तेलुगु, तामिळ, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि इतर बऱ्याच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive