मुलाच्या वाढदिवसाला धकधक गर्लची खास पोस्ट, मुलासाठी लिहीला हा खास मेसेज

By  
on  

धकधक माधुरी दीक्षित सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या प्रोफेशनल लाईफसह वैयक्तिक जिवनाविषयीच्या अपडेट्सही ती सोशल मिडीयावर पोस्ट करते. मुख्य म्हणजे या पोस्टमध्ये तिची मुलं आरिन आणि रियन यांच्याविषयीही बरचं काही असतं. 

माधुरीने नुकतीच एक खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट आहे मुलगा आरिनविषयी. आरिनच्या वाढदिवसानिमित्ताने माधुरीने मुलासाठी ही खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये माधुरीने आरिनसाठी एक खास मेसेजही लिहीला आहे. 

 

 

या पोस्टमध्ये माधुरी लिहीते की, "माझं बाळ आता अधिकृतपणे प्रौढ झाला आहे. 18 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आरिन. हे लक्षात ठेव की स्वातंत्र्यासोबतच जबाबदाऱ्याही येतात. आजपासून जग तुझं आहे मजा कर, संरक्षण कर आणि उजळ. तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं कर आणि आयुष्य मस्त जग. आशा आहे की हा प्रवास अविस्मरणीय साहसी आहे. लव्ह यू."

तेव्हा माधुरीने मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याला काही शिकवणही या पोस्टमधून दिली आहे. 

Recommended

Loading...
Share