By  
on  

अयोध्येमध्ये झाला अक्षय कुमार स्टारर ‘रामसेतू’ सिनेमाचा शुभारंभ, पाहा फोटो

अक्षय कुमारचा आगामी ‘रामसेतू’ सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाच्या शुटिंगच्या मुहुर्तासाठीअक्षय कुमार अयोध्येला रवाना झाला आहे. अक्षय कुमारसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा या दोघीदेखील आहेत. 
अक्षयने आता या सिनेमाच्या मुहुर्ताच्या पुजेचा फोटो शेअर केला आहे.

 

 

यामध्ये तो जॅकलीनसोबत पुजा करताना दिसत आहे. ‘आज अयोध्येत रामसेतूच्या शुभारंभावेळी भगवान श्रीराम यांचे आशिर्वाद मिळाले. जय श्री राम’ हे कॅप्शन देत त्याने पुजेचा फोटो शेअर केला आहे. अक्षय या सिनेमात पुरातत्व शास्त्रज्ञाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.  विक्रम मल्होत्राच्या अबुडांडिया एन्टरटेन्मेंट आणि अक्षयचं केप ऑफ गुड फिल्म्स ‘राम सेतु’ या सिनेमाची निर्मिती करत आहेत. अभिषेक शर्मा याचं दिग्दर्शन करतील.

Recommended

PeepingMoon Exclusive