By  
on  

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने केले मराठमोळ्या अक्षय इंडीकरचं कौतुक

मराठी कलाकारांच्या कलेची नेहमीच सर्वजण दखल घेतात. बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. तो सतत त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकताच अनुरागने मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत अक्षयचे प्रचंड स्तुती केली आहे. 

. “मी अक्षय इंडीकरचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट पाहिला. खूप सशक्त चित्रपट आहे. ज्या वेळी एका लहान मुलाला त्याचे वडील हे जग सोडून निघून गेले आहेत याची जाणीव होते तेव्हा त्या मुलाच्या मनात येणारे विचार आणि भावना चित्रपटात अतिशय सुंदररीत्या दाखवले आहे.. त्यानंतर आवाज, कोकणातील सुंदर देखावे, शार्प एडिटिंग पाहण्यासारखे आहे’ या आशयचे कॅप्शन देत अनुरागने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे अक्षयचं कौतुक केलं आहे. 

 

 

 

‘स्थलपुराण’ या चित्रपटाला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारतात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘स्थलपुराण’ चित्रपटाला अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाणारे दोन पुरस्कार मिळाले. यामध्ये ‘सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपट’ आणि ‘भारतातील सर्वोत्कृष्ट नवीन दिग्दर्शक’ या दोन पुरस्कारांचा समावेश आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive