By  
on  

पुन्हा शेअर मार्केट उसळणार, अभिषेक बच्चनच्या ‘बिग बुल’चा ट्रेलर रिलीज

शेअर मार्केटवरील घडामोडीवर पुन्हा एकदा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘बिग बुल’ असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. अभिषेक बच्चन ‘बिग बुल’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. या सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे.  १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद मेहता यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे.

 

 

या सिनेमात अभिषेकचा हटके अंदाज दिसून येतो आहे. निकिता दत्त आणि इलियाना डिक्रुजही या सिनेमात अभिषेकसोबत आहेत. या सिनेमात इलियाना डिक्रूज एका महिला पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. या तिघांशिवाय सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार दिसत आहेत. हा सिनेमा  ८ एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive