By  
on  

अयोध्येत शुटिंग करण्यापुर्वी अक्षय कुमारने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

अक्षय त्याच्या आगामी सिनेमा रामसेतूसाठी नुकताच अयोध्येला गेला आहे. यावेळी त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. कालच तो सिनेमाच्या शुटिंगच्या मुहुर्तासाठी अयोध्येला रवाना झाला होता. यावेळी त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा या दोघीदेखील होत्या. 

 

 

या सिनेमाचं 80% शुटिंग मुंबईत होणार आहे. अक्षय या सिनेमात पुरातत्व शास्त्रज्ञाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.  विक्रम मल्होत्राच्या अबुडांडिया एन्टरटेन्मेंट आणि अक्षयचं केप ऑफ गुड फिल्म्स ‘राम सेतु’ या सिनेमाची निर्मिती करत आहेत. अभिषेक शर्मा याचं दिग्दर्शन करतील

Recommended

PeepingMoon Exclusive