By  
on  

एअरलाईन्सने सोनू सूदला केला हटके सलाम, पाहा Photo

म्हणतात ना, माणसांत पण देव असतो. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ने अवघ्या जगाला हे दाखवून दिलं आहे. रिअल हिरोची उपाधी तो सार्थ ठरवतोय. लॉकडाऊनच्या काळात हजारो प्रवासी मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूदचं मदत कार्य विविधप्रकारे सुरुच आहे. त्यामुळे तो आपसूकच चर्चेत येतो. त्याला प्रसिध्दीचा कुठलाही हव्यास नाही. तो मनापासून गरजूंची मदत करतो, हेच वेळोवेळी पाहायला मिळतं. 

अनेकांना रोजगार मिळवून देणं. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं ,अशा त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होते..सोनूच्या कार्याचा गौरव अनेकप्रकारे झालेला पाहायला मिळाला. कुठे कोणी त्याचा पुतळा उभा केला तर कोणी वाळू शिल्प साकारत या रिअल हिरोला वंदन केलं. तर कोणी सोनूच्या नावावर दुकानाचं उद्घाटन केलं . आत्तासुध्दा सोनू सूदला एका  एअरलाईन्स कंपनीकडून हटके अंदाजात सन्मानित करण्यात आलं आहे. 

 

स्पाईस जेट कंपनीने सोनू सूदच्या कार्याचा गौरव करण्यासाठी  स्पाइजेट बोइंग 73वर सोनू सूदच्या चेहरा साकारला आहे.  'ए सैल्यूट टू द सेविअर सोनू सूद' असंही त्यावर लिहलं आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive