By  
on  

अक्षय कुमारने संपवलं ‘अतरंगी रे’ चं शुटिंग, दिसला जादुगाराच्या वेशभुषेत

अक्षय कुमारने अलीकडे त्याच्या ‘अतरंगी रे’ चं शुटिंग संपवलं. अक्षयसोबतच सारा अली खान आणि धनुष हे दोघे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.  अक्षयने सोशल मिडियावर फोटो शेअर करत या सिनेमाच्या रॅप अपची घोषणा केली आहे. या फोटोमधून अक्षय हटके अंदाज दिसून येत आहे. अक्षय या फोटोत जादूगाराच्या लूकमध्ये दिसतो आहे.

 

 

“आज अंतरंगी रे चा शेवटचा दिवस होता. आनंद एल यांची जादू अनुभवण्यासाठी प्रतिक्षा करणं कठीण आहे. शिवाय माझे सह कलाकार सारा आणि धनुषचेही आभार त्यांनी मला या सुंदर सिनेमात सहभागी होऊ दिलं. हे कॅप्शन देत अक्षयने भावना व्यक्त केल्या आहेत. या सिनेमाचं शुटिंग ऑक्टोबरमध्ये मदुरैमध्ये सुरु झालं होतं. त्यानंतर पुढचं शेड्युल दिल्ली इथे होतं. यादरम्यान अक्षय आणि साराची ताजमहालच्या पार्श्वभूमीवरचे फोटोही व्हायरल झाले होते.

Recommended

PeepingMoon Exclusive