'रामसेतू'मध्ये अक्षय कुमार बनला पुरातत्वशास्त्रज्ञ, सिनेमाच्या चित्रीकरणाला केली सुरुवात

By  
on  

बॉलीवुड सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमारने काही काळापूर्वी अयोध्यामधील रामलीलासमोर त्याचा आगामी सिनेमा रामसेतुचा मुहूर्त केला होता. यातच आता अक्षय कुमारने सोशल मिडीयावर या सिनेमा संदर्भातली घोषणा केली आहे. अक्षयने या सिनेमातील त्याचा लुक प्रदर्शित केला आहे. याशिवाय आजपासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचं अक्षयने या पोस्टमध्ये म्हटलय.

अक्षयने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर ही पोस्ट केली आहे. अक्षय या पोस्टमध्ये लिहीतो की, "माझ्या सगळ्यात खास सिनेमाचा प्रवास आज सुरु होत आहे. रामसेतुचं शूटिंग सुरु झालय. मी सिनेमात एका  पुरातत्वशास्त्रज्ञच्या भूमिकेत आहे. या लुकवर तुमचे विचार शेयर करा. तुमचे विचार माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे असतात."

 

अक्षयचा या सिनेमातील हा नवा लुक आता चर्चेत आला आहे. तेव्हा या सिनेमाचं शुटिंग सुरु होत असल्याचं सांगत अक्षयने चाहत्यांसाठी ही खास पोस्ट शेयर केली आहे.

सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी सांगीतलं होतं की सिनेमाचं 80% शुटिंग हे मुंबईत होणार आहे. त्यांनी हे देखील सांगीतलं होतं की अक्षय कुमार एका नव्या रुपात समोर येणार आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आणि नुशरत बरुचा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Recommended

Loading...
Share