By  
on  

बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात केलं दाखल

देशभरात पुन्हा कोरोनाची लाट पसरली आहे. यातच मनोरंजन विश्वातील कलाकारही या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. बऱ्याच कलाकारांची कोविड चाचणी पॉजिटिव आल्याचं समोर आलं आहे. यातच आता दिग्गज गायक, संगीतकार बप्पी लहरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोविड चाचणी पॉजिटिव आली आहे. बप्पी यांना उपचारासाठी आता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या प्रवक्ताने याविषयी माहिती दिली आहे.

त्यांच्या प्रवक्ताने सांगीतलं की, "योग्य ती काळजी घेऊनही संगीतकार बप्पी यांची कोरोना चाचणई पॉजिटिव आली आहे. सध्या त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी सगळ्यांना आग्रह केला आहे की जे त्यांच्या संपर्कात आले त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. काळजी घेऊनही बप्पी यांची कोविड 19 चाचणी पॉजिटिव आली आहे. ते सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात चांगले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. बप्पी दादांचा परिवार सगळ्यांना सांगत आहेत की जे त्यांच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोविड चाचणी करुन घ्यावी. त्यांना  चाहते, मित्र आणि भारत, विदेशातील सगळ्यांचा आशिर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे. बप्पी दांकडून त्या सगळ्या चाहत्यांना स्वस्थ राहण्यासाठी शुभेच्छा देत संदेश देत आहेत."

बप्पी लहरी यांची मुलगी रेमा लहरी बंसलने सांगीतलं की, "बप्पी दा नी सतत कोरोनाच्या नियमांचं पालन केलं आहे. सगळ्या प्रकारची काळजी घेतली, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्याच कोरोनाची काही लक्षणे जाणवली, ज्यानंतर त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यांची चाचणी पॉजिटिव आली. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्याचा निर्णय पूर्ण परिवाराने घेतला आहे. म्हणूनच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय."

Recommended

PeepingMoon Exclusive