अक्षय कुमारची कोरोना चाचणी आली पॉजिटिव, स्वत:ला केलं क्वारंटाईन

By  
on  

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. कोरोना पॉजिटिव रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक कलाकारांची कोविड चाचणी पॉजिटिव आली आहे. आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट यांच्यानंतर आता अक्षय कुमारही या कोरोनाच्या विळख्यात सापाडला आहे. सध्या अक्षय हा 'राम सेतु' या त्याच्या आगामी सिनेमाचं चित्रीकरण करत होता. कोरोना चाचणी केल्यानंतर अक्षयची कोविड चाचणी पॉजिटिव आली आहे.

 अक्षयने सोशल मिडीयावर त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहीलय की, "मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आज सकाळी माझी कोविड चाचणी पॉजिटिव आली आहे. सगळ्या नियमांचं पालन करुन मी लगेच स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरात क्वारंटाईन आहे आणि योग्य ते उपचार घेतोय. मी सगळ्यांना सांगतो की जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोविड चाचणी करुन घ्यावी आणि स्वत:ची काळजी घ्या. लवकरच परत कृतीत येईल."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

 'राम सेतु'च्या चित्रीकरणाआधी अक्षयने सारा अली खान आणि धनुषसोबत अतरंगी रे चं चित्रीकरण संपवलं होतं. अक्षय हा पहिला बॉलिवुड स्टार होता ज्याने कोरोनाच्या लॉकडाउननंतर बेल बॉटम सिनेमाच्या चित्रीकरणासह कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर मग 'बच्चन पांडे', 'पृथ्वीराज', 'अतरंगी रे' आणि आता 'राम सेतु'चं चित्रीकरण अक्षय करतोय. कोरोनातून बरा झाल्यानंतर अक्षय पुन्हा चित्रीकरण सुरु करणार असल्याचं पोस्टमध्ये म्हटलाय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

Recommended

Loading...
Share