By  
on  

अक्षय कुमारनंतर आता अभिनेता गोविंदालाही कोरोनाची लागण

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत कोरोना पॉजिटिव रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारही आता या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट यांची कोविड चाचणी पॉजिटिव आल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमारलाही कोरोनाची लागण झाल्याचं त्याने सोशल मिडीयावर सांगीतलं. आता अभिनेता गोविंदाची कोविड चाचणीही पॉजिटिव आली आहे.

गोविंदाची कोरोनाची चाचणी पॉजिटिव होताच त्याला होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सध्या गोविंदावर योग्य ते उपचार सुरु आहेत. रविवारी सकाळी गोविंदाची चाचणी पॉजिटिव आल्यानंतन त्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना सतर्क केलं आणि कोविड चाचणी करण्याचं अपील केलं. 

गोविंदा याविषयी सांगतो की, "मी उपचार घेत आहे आणि या व्हायरस पासून दूर राहण्यासाठी सगळ्या सावधगिरी बाळगत आहे. आज सकाळी हलकी लक्षणे पाहायला मिळाली त्यानंतर कोरोना चाचणी पॉजिटिव आली आहे. घरातील इतर जण नेगेटिव आहेत. पत्नि सुनीता काही आठवड्यांपूर्वीच कोविड-19 पासून बरी झाली आहे."

तर नुकतच अभिनेता अक्षय कुमारने त्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मिडीयावर दिली आहे. अक्षयही सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive