By  
on  

तब्बस्सुम यांची कोरोनावर मात, अल्झायमरच्या अफवांवर मुलाने केला खुलासा

ज्येष्ठ अभिनेत्री तब्बस्सुम यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या 76 वर्षांच्या आहेत. त्यांनी कोरोनावर आता यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आत्ता त्या पूर्णपणे ठिक झाल्या असून कुटुंबियांसोबत घरी  आहेत.

यादरम्यान तब्बस्सुम यांचा एक फोटो खुप व्हायरल झाला होता. त्यात त्या  फार अशक्त दिसत होत्या. तसंच त्या कोणाला ओळखत नसून त्यांना अल्झायमर झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण तब्बस्सुम यांच्या मुलाने होशंग गोविलने या अफवा साफ खोट्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. 

 

 

अभिनेत्री तब्बस्सुम या ७६ व्या वर्षीदेखील काम करत आहेत, अभी तो में जवान हूं हा टॉक शो त्या टीव्ही एशियासाठी करत आहेत. फुल खिले हैं गुलशन गुलशन या कार्यक्रमामुळे तब्बस्सुम यांना खरी ओळख मिळाली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive