By  
on  

“पोस्ट प्रोडक्शनचं काम तरी करु द्या!" मनोरंजन क्षेत्राची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती

देशावर करोनाचं सावट अद्यापही दाट आहेत. करोनाच्या दुस-या लाटेत रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. म्हणूनच करोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. १४ एप्रिलपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे चित्रपटांसंदर्भातल्या काही संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. तसेच काही विशेष सवलती देण्याचीही विनंती केली आहे.

हातावर पोट असणा-या सिनेसृष्टीतील रोजंदारीवर काम करणा-या कामगारांचं या निर्बंधांमुळे खुप हाल होत आहेत. चित्रपटासंदर्भातील काही संघटना जसं की IMPPA, IFTDA, FWICE, CINTAA यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित या मागण्या केल्या आहेत. प्रशासनाच्या नव्या निर्बंधांनुसार, चित्रीकरण आणि त्यानंतरच्या सर्व प्रक्रियेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रात या संघटनांनी बंदिस्त जागेतल्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला परवानगी देण्याची विनंती केली आहे, जेणेकरुन चित्रीकऱणानंतरचा काम पूर्ण होऊन कार्यक्रम अथवा चित्रपट प्रदर्शनासाठी पूर्ण होतील.

त्याचसोबत फिल्मसिटीच्या भागात कलाकार -तंत्रज्ञ कामगारांसाठी लसीकरण केंद्रं उभारण्याची विनंतीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive