By  
on  

कोरोना काळात मदतीचा हात देणारा अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण

देशात आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट पाहायला मिळतेय. यात अनेक बॉलीवुड कलाकारांनीही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात कोरोनाग्रस्त काळात अनेकांना मदतीचा हात पुढे करणाऱ्या सोनू सूदलाच कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सोनूने याविषयी माहिती दिली आहे.

सोनूने ट्विट करून त्याची कोविड चाचणी पॉजिटिव आल्याची माहिती दिली आहे. तो लिहीतो की, "कोविड पॉजिटिव, मूड आणि स्पिरिट - सुपर पॉजिटिव. सगळ्यांना नमस्कार, मला तुम्हाला ही माहिती द्यायची आहे की, आज सकाळी माजी कोरोना चाचणी पॉजिटिव आली आहे. सुरक्षिततेची काळजी लक्षात घेता मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे. चिंता करू नका मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आता बराच वेळ मिळाला आहे. नेहमी लक्षात ठेवा मी तुमच्या कायम सोबत आहे."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

 

नुकतच सोनूने कोरोना रुग्णांसाठी बेड्स आणि औषधांची व्यवस्था करु न शकल्यावर असहाय्यता व्यक्त केली होती. याशिवाय सोनूने सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे देखील सांगीतलं होतं की गरजूंना रेमडेसिविर आणि इंदौरमध्ये 10 ऑक्सिजन सिलेंडर पाढवल्याची माहिती दिली होती. याशिवाय त्याने केंद्र सरकारला ऑफलाइन परिक्षा कॅन्सल करण्याचीही मागणी केली होती. 

 मागील वर्षापासून कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेक गरुजूंना आणि गरिबांना सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला होता. सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही अनेक गरजूंनी त्याच्याशी संपर्क साधला होता. यासाठी विविध स्तरावर सोनू सूदचं कौतुक झालं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive