By  
on  

आशुतोष राणा यांच्यानंतर पत्नी रेणुका शहाणेसह मुलांनाही कोरोनाची लागण

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून अनेक जण या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकारांचाही समावेश आहे. अभिनेता आशुतोष राणा यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता त्यांची पत्नी अभिनेत्री रेणुका शहाणे आणि मुलांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 

नुकतीच रेणुका शहाणे आणि त्यांची मुलं शौर्यमान आणि सत्येंद्र यांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. सध्या हे सगळे घरातच क्वारंटाईन आहेत. याआधी कोरोनाची लागण झाल्याने आशुतोष राणा हे घरात क्वारंटाईन होते. आशुतोष आणि रेणुका यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. 

काही दिवसांपूर्वी आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांनी कोरोना वॅक्सिनेशनची लस घेतली होती. 

सध्या अनेक कलाकारांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. अभिनेता सोनू सूद, नील नितीन मुकेश, अर्जुन रामपाल, मनिष मल्होत्रा या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याआधी आलिया भट, रणबीर कपूर, अक्षय कुमार, विकी कौशल, कतरिना कैफ, कार्तिक आर्यन या कलाकारांचीही कोविड चाचणी पॉजिटिव आली होती. हे कलाकारही घरातच क्वारंटाईन होते आणि कोरोनातून बरे झाले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive