By  
on  

संगीतकार जोडी नदीम-श्रवण फेम श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण, प्रकृती गंभीर

कोरोना वायरसची सध्या दुसरी लाट आली आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारही या विषाणूच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. दररोज विविध कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. यातच प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवण यापैकी श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

एका प्रसिद्ध वेबसाईने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात श्रवण यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर कृति भूषण यांनी कन्फर्म केलं आहे की त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होत आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांची स्थिती चिंताजनक आहे.  श्रवण यांचे जवळचे मित्र आणि गीतकार समीर यांनी याविषयी सांगीतलं की, "श्रवण यांना डायबिटीज आहे आणि या इन्फेक्सनमुळे त्याचा फुफ्फुसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. याशिवाय श्रवण यांना हदयासंदर्भातील त्रासही सुरु झाले आहेत. देव त्यांना लवकर बरे करो हीच प्रार्थना करा."

1990 च्या दशकात बॉलीवुडमध्ये नदीम-श्रवण यांच्या संगीताचा दबदबा होता. नदीम हे त्यांचे मित्र श्रवण यांच्यासोबत मिळून संगीत देत असे. फिल्म आशिकीमध्ये त्यांचं रोमँटिक गाण्यांचं संगीत चांगलच लोकप्रिय ठरलं. त्यानंतर गुलशन कुमार यांच्या हत्येमध्ये त्यांचं नाव आल्यानंतर नदीम आणि श्रवण यांची जोडी तुटली. नदीम-श्रवण यांनी 'आशिकी', 'साजन', 'सडक', 'दिल है कि मानता नही', 'साथी', 'दीवाना', 'फुल और कांटे', 'राजा हिंदुस्तानी', 'जान तेरे नाम', 'रंग', 'राजा', 'धडकन', 'परदेस', 'दिलवाले', 'राज' या सिनेमांसाठी या जोडीने संगीत दिले आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive