By  
on  

म्हणून आता इरफानचा मुलगा बाबिल शेअर करत नाही त्याच्या आठवणी

मागील वर्षी अभिनेता इरफान खान याने जगाचा निरोप घेतला. यानंतर इरफानचा मुलगा बाबिल अनेकदा सोशल मिडियावर इरफानच्या आठवणी शेअर करत असतो. पण काही त्याने या आठवणी शेअर करणं थांबवलं. त्याच्या आणि इरफान यांच्या चाहत्यांनाही या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. याबाबत बाबिलला विचारल्यावर त्याने दिलेलं उत्तर मात्र अवाक करणारं होतं. 

 

एका शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये बाबिल म्हणते, ‘मला शेअर करायला आवडतं पण त्यानंतर मला असे मेसेजेस सारखे येतात की मी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांचा वापर करत आहे आणि त्यामुळे मी फार दुखावलो जातो. खरंतर त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत असतो.

मी आता खूप गोंधळलेलो आहे जेव्हा अनोळखी व्यक्ती मेसेज करते की मी त्यांच्या आठवणी शेअऱ करुन सहानुभूती मिळवत आहे. मला काहीही मिळवायचं नाही. पण मी आता खूप दुखावलो गेलो आहे. त्यामुळे मला जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा मी शेअर करेन.  इरफानचं मागील वर्षी 29 एप्रिलला करोनाने निधन झालं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive