By  
on  

Radhe Trailer : सलमान खानच्या 'राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, सलमानचा एक्शन धमाका

सलमान खानची या वर्षीचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. डायलॉग आणि धमाकेदार एक्शनने भरलेला असा ट्रेलर पाहायला मिळतोय. प्रभुदेवा दिग्दर्शित या सिनेमात सलमान खान पोलिसाच्या भूमिकेत आहे. या सिनेमा रणदीप हुडा खलनायक साकारतोय जो ड्रग लॉर्डच्या भूमिकेत आहे. तर दिशा पाटनी फिमेल लीडमध्ये दिसतेय. सिनेमात जॅकी श्रॉफ देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

 या ट्रेलरमध्ये सलमान खानचा धमाकेदार अंदाज पाहायला मिळतोय. एक्शन, डायलॉग आणि डान्स-गाणी असा मसालापट असल्याचं ट्रेलरमधून पाहायला मिळतय. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रभुदेवा आणि समलान खानची जोडी काय कमाल करतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

कोरोनामुळे देशात आणि देशाबाहेर जिथे सिनेमागृह सुरु आहेत, तिथे 13 मे रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर झी प्लेक्सवरही हा सिनेमा प्रेक्षक पाहु शकतील. सलमानच्या प्रवक्त्याकडून हे सांगीतलं गेलय की सध्याच्या कोरोनाग्रस्त स्थितीत आपल्याला अशा समाधानाविषयी विचार करायचाय ज्यात सगळ्यांचं हित असेल. थिएटर मालकांनाही आधार द्यायचाय. सोबतच कोविड-19 ची स्थिती पाहता या सिनेमाला प्रेक्षकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवायचं आहे.

 निर्मात्यांकडूनही स्टेटमेंट प्रसिद्ध करण्यात आलय. ज्यात ते सांगतात की, "सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन झी स्टुडियोज ने मल्टीप्लेटफॉर्म स्ट्रेटेजीचा वापर केलाय. ज्याने कोविड 19 नियमांचे पालन करून हा सिनेमा झी प्लेक्सवर उपलब्ध असेल. सिनेमागृह आणि झी प्लेक्स शिवाय हा सिनेमा पे पर व्ह्यू नुसार डीटीएच प्लॅटफॉर्म झिश, डी 2 एच, टाटा स्काई आणि एअरटेल डिजिटल टिव्हिवर उपलब्ध असेल."झी स्टुडियोज चे सीईओ शारिक पटेल यांनी सांगीतलं की, "फॅन्स बराच काळापासून राधेची वाट पाहत आहेत. या सिनेमाला 40 देशांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे."   

Recommended

PeepingMoon Exclusive