माधुरी दीक्षितच्या या सिनेमाला पूर्ण झाली 27 वर्षे, पहिल्यांदा झळकली होती शाहरुख सोबत

By  
on  

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने 90 चं दशक चांगलच गाजवलं होतं. माधुरीच्या अदा, डान्स, अभिनय या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या होत्या. यातच आणखी एका सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. तो सिनेमा म्हणजे 'अंजाम'. मात्र या सिनेमात माधुरी पेक्षा या सिनेमातील अभिनेत्याने सगळ्यांना चकित केलं होतं. तो अभिनेता शाहरुख खान. 'अंंजाम' सिनेमाच्या निमित्ताने माधुरी आणि शाहरुख खान पहिल्यांदाच एकत्र झळकले होते. 

या सिनेमात शाहरुखने खलनायक साकारला होता. ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला होता. याच सिनेमाला नुकतीच 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने माधुरीने सोशल मिडीयावर या सिनेमाच्या आठवणीला उजाळा दिला आहे. राहुल रवैल दिग्दर्शित हा सिनेमा एक सायकॉलॉजीकल थ्रिलर सिनेमा होता. 

 

या सिनेमाविषीय माधुरी लिहीते की, "शाहरुख खान आणि दिपक तिजोरी यांच्यासोबतचा माझा एक अविस्मरणीय सिनेमा. ज्यात भावना, ड्रामा आणि मनोरंजन होतं." सोबतच सिनेमाचे पोस्टर्स आणि फोटोही शेयर केले आहेत

माधुरीने म्हटल्याप्रमाणे या सिनेमात ड्रामा आणि मनोरंजन होतच. शिवाय शाहरुखच्या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर माधुरी आणि शाहरुख ही जोडी अनेक सिनेमांमध्ये झळकली. प्रेक्षकांनी या जोडीला पसंतीची पावती दिली. 'कोयला', 'दिल तो पागल है', 'हम तुम्हारे है सनम', 'देवदास' या सिनेमांमध्ये या जोडीने एकत्र काम केलं आहे.

Recommended

Loading...
Share