श्रीराम नेनेंनी शेयर केला माधुरीसोबतचा थ्रोबॅक फोटो, म्हटले "आपण या परिस्थितीत एकत्र आहोत"

By  
on  

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत एकीकडे कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत तर दुसरीकडे या संकटातही सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत.

धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे पति डॉ. श्रीराम नेने देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मिडीयावर आता त्यांचाही चाहतावर्ग तयार झाला आहे. यातच सध्याच्या परिस्थितीत सकारात्मकता आणण्यासाठी त्यांनी खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी माधुरीसोबतचा थ्रोबॅक म्हणजेच जुना फोटो शेयर केला आहे. मात्र या पोस्टच्या कॅप्शनमध्ये जे लिहीलय ते महत्त्वाचं आहे. ते लिहीतात की, "हे विसरु नका की या सगळ्यात एकत्र आहे. भारतात सध्या आव्हानात्मक परिस्थिती आहे. पण देशभरातील लोकं आपल्याला मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. भारतात आपल्याला एकमेकांचे मदतगार आणि हिरो बनायचय. या प्रक्रियेत आपण नक्कीच अंधारातून प्रकाशाकडे  वळू."

 

एकमेकांना मदत करत या संकटातून लवकरच बाहेर पडू असा सकारात्मक संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला आहे.  ट्रोलिंग आणि नकारात्मकतेने भरलेल्या सोशल मिडीयाचा वापर या कोरोना काळात एकमेकांना मदत करण्यासाठी होत आहे.सोशल मिडीयामुळे अनेकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कोणत्या गोष्टीची गरज आहे याविषयी माहिती मिळतेय, आणि त्यानुसार मदतही पोहोचवली जात आहे. यात विविध क्षेत्रासह मनोरंजन विश्वातील कलाकारही मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. या काळात सगळे एकत्र येऊन सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही मदत करताना दिसत आहेत.

 

Recommended

Loading...
Share