By  
on  

पाहा Video : बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा घेऊन येत आहेत 'केबीसी', आगामी 13 व्या पर्वाचा प्रोमो केला प्रदर्शित

बॉलीवुडचे शहनशाह महानायक बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी कौन बनेगा करोडपती हा प्रसिद्ध कार्यक्रम घेऊन येत आहेत. यंदाचं हे 13 वं पर्व असेल. नुकतच सोनी टीव्ही वाहिनीने एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यात 13 व्या सिझनची घोषणा करत बिग बींची झलक पाहायला मिळत आहे.

पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने बिग बी याचं सूत्रसंचालन करतील. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या प्रोमोत बिग बी म्हणतात की, "कधी विचार केलाय की तुम्ही आणि तुमच्या स्वप्नांमधील अंतर किती आहे तर तीन अक्षरांचा".

 

तेव्हा या केबीसीची हॉट सीट आणि बिग बी वाट पाहत असल्याचं ते या प्रोमोमध्ये सांगतात. यात केबीसीच्या नोंदणीची तारीखही सांगण्यात आली आहे. येत्या 10 मे पासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. 

बिग बी अमिताभ बच्चन यांनी केबीसी या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या तब्बल 12 सिझनचं सूत्रसंचालन आत्तापर्यंत केलं आहे. तिसऱ्या पर्वासाठी किंग खान शाहरुखने सूत्र हाती घेतली होती. मात्र त्यानंतर पुन्हा बिग बींनी या शोची धुरा सांभाळली आणि ते आत्तापर्यंत सांभाळत आहेत. अमिताभ बच्चन यांची अनोखी शैली या कार्यक्रमाला लाभल्याने इतकी वर्षे हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. 

अनेक पर्वांमध्ये या कार्यक्रमात येणार काही हुशार स्पर्धक कोटींची कमाई करुन जातात. यंदा या कार्यक्रमात कोण कोटींची बाजी मारतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Recommended

PeepingMoon Exclusive