By  
on  

सलमानने ‘राधे’च्या कमाईबाबत केली मोठी घोषणा, करणार हे काम

बॉलिवूडचा भाईजान सलामान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने 13 मेला ‘राधे युवर मोस्ट वाँटेंड भाई’ रिलीज करणार असल्याचं सांगितलं आहे. या सिनेमाबाबत मेकर्सनी मोठी घोषणा केली आहे. करोनाच्या वाढत्या संक्रमणाला पाहता राधे सिनेमातून मिळालेली रक्कम ही गरजूंच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

 

 

सलमान खान फिल्म्स आणि झी इंटरटेनमेंट इंटरप्रायजेस लिमिटेड हे ‘गिव्ह इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. या मदतीचं स्वरुप ऑक्सिजन सिलेंडर्स, औषध आणि व्हेंटिलेटर्स असं असणार आहे. सलमान खान फिल्म्सच्या प्रवक्त्याने यावेळी सांगितलं की, या उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला आनंद झाला आहे. आम्हाला करोनाच्या विरोधात असलेल्या देशाच्या या लढाईत हातभार लावायचा आहे. गेल्या वर्षापासून आपण करोना संसर्गाविरुद्धोधात लढण्याचा प्रयत्न करत आहोत. करोनाचा परिणाम आपल्या देशासोबतच जगावर झाला आहे.”  या सिनेमात सलमानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ आणि गौतम गुलाटी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive