By  
on  

लॉकडाऊनच्या काळात नात्यांमधील मतभेद आणि दुरावा याविषयी सांगतेय गिरिजा ओकची ही शॉर्ट फिल्म

कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे या कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक कामधंदे ही ठप्प झाले आहेत. यासोबत मानसिक आरोग्य आणि नात्यांवरही याचा परिणाम होताना दिसत आहे. आणि याच विषयावर दिग्दर्शक आशिम सेन हे एक लघुपट घेऊन आलेत. अभिनेत्री गिरिजा ओक आणि अलपेश दीक्षित या लघुपटात झळकत आहेत. 11 मिनीटांच्या या लघुपटात लॉकडाऊनच्या काळात नात्यांमधील मतभेद आणि दुरावा याविषयी भाष्य केलं आहे.

 या लघुपटात एका विवाहीत जोडप्याची कहाणी आहे. लॉकडाऊनच्या काळात एकीकडे पतिचा कामधंदा बंद होऊन जातो. तर पत्नीचा बिझनेस मात्र चांगला सुरु असतो. अशात या दोघांच्या नात्यात मतभेद निर्माण होतात.  

 या लघुपटाविषयी दिग्दर्शक आशिम सेन म्हणतात की, "लॉकडाऊनने लोकांना घरात राहण्याशिवाय कोणताच पर्याय दिलेला नाही. या काळात जरी अनेक जण आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवत असतील तरी  त्यांच्यात मदभेद आणि अस्थिरता निर्माण होत आहे. या काळात अनेक घर तुटण्याविषयी, ब्रेकअप्सविषयी मी ऐकतोय. यातूनच प्रेरणा घेऊन मी ही कहाणी लिहीली आहे. माझी फिल्म दरार ही प्रेक्षकांना एका ओपन एंड सोबत सोडून देते आणि प्रेक्षक स्वत: जीवनातील या काळाविषय़ी आपल्या नजरेने पाहून त्याविषयी निर्णय घेऊ शकतात. मला गिरिजा आणि अल्पेश सारखे जबरदस्त कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. मी खूप खुश आहे. या प्रोजेक्टआधी त्यांच्यासोबत फक्त दोन रिडींग केली होती. दोघांनी प्रत्येक शॉटमध्ये त्याच्या प्रतिभाने चार चांद लावले आहेत. "

 

हा लघुपट प्रदर्शित झाला असून युट्यूबवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive