By  
on  

सुधा चंद्रन यांचे वडील अभिनेते केडी चंद्रन यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील आणि अभिनेते केडी चंद्रन यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालय. ते 86 वर्षांचे होते. रविवारी सकाळी मुंबईत दाखल असलेल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री सुधा चंद्रन यांनीच ही निधनाची बातमी सांगीतली आहे. त्यांनी सांगीतलं की त्यांच्या वडीलांना डिमेशिया या आजारानं ग्रासलं होतं. 12 मे रोजी जुहूमधील क्रिटी केयर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

वडिलांना अखेरचा अदविदा करताना सुदा चंद्रन त्यांच्या पोस्टमध्ये लिहीतात की, "अलविदा अप्पा.. आपण पुन्हे भेटेपर्यंत. तुमची मुलगी असण्याचा अभिमान आहे. तुम्हाला मी वचन देते की तुमची तत्त्व, अनुभव आणि महत्त्व यांचं मी शेवटच्या श्वासापर्यंत अनुसरण करेल. पण मी हे कबुल करते की तुमच्यासोबत माझा भागही तुमच्यासोबत गेलाय. रवी आणि सुधाचं तुमच्यावर अनंतकाळ प्रेम आहे. देवाला प्रार्थना करते की पुन्हा तुमची मुलगी बनूनच जन्माला यावी. ओम शांती."

 

केडी चंद्रन यांनी 'हम हैं राही प्यार के', 'चाइना गेट', 'मैं माधुरी दीक्षित बनाना चाहता हूं!', 'जब प्यार किसी से होता है', 'तेरे मेरे सपने', 'हर दिल जो प्यार करेगा', 'शरारत' और 'कोई... मिल गया' यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यांनी टीव्ही दुनियेतही खास ओळख निर्माण केली होती. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive