By  
on  

संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील विजय पाटील यांच्या निधनावर सलमानने ट्विट करत वाहिली श्रध्दांजली

मराठी व हिंदी सिनेविश्वातील प्रसिध्द संगीतकार जोडी राम लक्ष्मण यातील लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. नागपूर येथे पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. संगीतक्षेत्रात या जोडगोळीने भरीव योगदान दिलं. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या नावाने दिल्या  जाणा-या लता मंगेशकर पुरस्काराचाही यात समावेश आहे.तसंच मैने प्यार किया या राजश्री प्रोडक्शनच्या सुपरहिट सिनेमासाठी  या जोडीला फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. 

राम-लक्ष्मण जोडीतील विजय पाटील यांच्या निधनावर सलमान खाननेसुध्दा ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. सलमान खान आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, माझे सुपरहिट सिनेमे जसे की, मैने प्यार किया, पथ्थर के फुल, हम साथ साथ है, हम आपके है कौन यांना संगीत देणारे संगीतकार राम-लक्ष्मण यांचील लक्ष्मण यांचं निधन झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि या दु:खातून सावरण्याची कुटुंबियांना शक्ती मिळो. 

 

सुपरहिट सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी राम-लक्ष्मण जोडीने सिनेसृष्टीला दिली. ‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही तर यशस्वीही झाले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या सिनेमांना त्यांनी संगीत दिले.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive