By  
on  

स्वातंत्र्यदिना दिवशी सुर्यवंशी आणि बेलबॉटमच्या रिलीज होण्याबाबत अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया

अभिनेता अक्षय कुमारचे महत्त्वाकांक्षी सिनेमे पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. पीपिंगमूनने यापुर्वीच सांगितल्याप्रमाणे परिस्थिती पूर्वपदावर आली व सिनेमगृह सुरु करण्यास अनुकुलता मिळाली तर येत्या 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी बहुचर्चित सूर्यवंशी हा सिनेमा प्रदर्शित होईल. तर दुसरीकडे अक्षय कुमारचाच बेलबॉटम हा सिनेमा एमेझॉन प्राईम या ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

तसंच या प्रजर्शनासाठीसुध्दा  स्वातंत्र्यदिनाच्याच तारखेवर मेकर्सची पसंती आहे. रिपोर्टनुसार मेकर्सनी डिजीटल प्रिमीयरसाठी एमेझॉन प्राईमला स्पाय ड्रामा बेलबॉटम विकल्याचं समोर येत आहे. यावर अक्षय कुमारची प्रतिक्रियाही समोर आली आहे. 
तो म्हणतो, ‘ प्रेक्षकांचं या सिनेमाप्रती असलेलं प्रेम पाहून मी कृतज्ञ आहे. सध्या या सिनेमाची चर्चा सुरु आहे. पण हे सांगता येत नाही की दोन्ही सिनेमे स्वातंत्र्यदिना दिवशीच रिलीज होतील. निर्माते याचा निर्णय घेत आहेत. सुर्यवंशी मागील वर्षी मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण करोना परिस्थितीमुळे याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive