By  
on  

Billboard Music Awards 2021: सोहळ्यात प्रियांका चोप्रा जोनासवर खिळल्या सर्वांच्याच नजरा

बॉलिवूड गाजवल्यानंतर विदेशातसुध्दा आपला डंका वाजवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच स्व:ताला सर्वांपेक्षा वेगळं सिध्द करण्यात पुढे असते. अनेक इव्हेंट्स्, रेड कार्पेट लुक्स आणि अवॉर्ड फंक्शन्समधला प्रियांकाचा लुक नेहमीच सर्वांचंच लक्ष वेधून घेतो. नेहमीच स्टायलिश राहण्यावर भर देणारी प्रियांका नुकतीच  बिलबोर्ड  म्युझिक अवॉर्ड्स 2021 मध्ये पती निक जोनाससोबत एका खास ्अंदाजात हजर होती. पण प्रियांका नुसती हजरच नव्हती तर बोल्ड आणि ग्लॅमरस ्अंदाजात ती तिथे अवतरल्याने सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. 

 

 

मोकळे सोडलेले केस, गोल्डन रंगाचा गाऊन आणि न्यूड मेकअप असा प्रियांकाचा हटके लुक होता. तर निकही जीन्स आणि ग्रीन कलरच्या जॅकेटमध्येै उठून दिसत होता.  बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स 2021 मधील प्रियांका-निकचं हे फोटोशूट सोशल मिडीयावर बरंच चर्चेत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive