By  
on  

संजय लीला भन्साळींच्या ‘बैजू बावरा’ मध्ये या हटके भूमिकेत दिसणार दीपिका पदुकोण?

संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोण हे सुपरहिट सिनेमांचं कॉम्बिनेशनच बनलं आहे. आता ही जोडी पुन्हा चौथ्या सिनेमासाठी एकत्र येत असल्याचं समोर येत आहे. गंगूबाई काठियावाडीनंतर बैजू बावरा हा सिनेमा हातात घेणार आहेत. हा सिनेमा संजय लीला भन्साळी यांचा ड्रीमप्रोजेक्ट असल्याचं बोललं जात आहे. 

या सिनेमाच्या इतर कलाकारांबाबत चर्चा होत नसली तरी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. दीपिका या सिनेमा लिडींग लेडी असणार आहे. दीपिकाला या सिनेमात घेण्याबाबत संजय यांच्या मनात कोणताही किंतु नव्हता. दीपिकाला ते डाकू राणी रुपमतीच्या भूमिकेत कास्ट करणार असल्याचं समोर येत आहे. या दरम्यान दीपिका आणि संजय यांच्या अनेक मिटींग्ज झाल्या आहेत. त्यामुळे दीपिका या सिनेमाला होकार देण्याची शक्यता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive