By  
on  

ट्विंकल आणि अक्षय कुमारचा दानशूरपणा , जाणून घ्या

देशात करोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोना महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार व आरोग्य यंत्रणा शर्थीचे पर्यत्न करतायत. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलीय. या कठीण काळात अनेक सेलिब्रिटी पुढे येत आपापल्या परिने योग्य ती मदत करतायत. पुन्हा एकदा बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या दानशूरपणाचा प्रत्यय आला आहे. 

अक्षय कुमार गणेश आचार्य फाऊंडेशनच्या साहाय्याने 3600 डान्सर्सना एक महिन्याचे किराणा सामान देणार आहे. हे सामान फाऊंडेशनसोबत रजिस्टर असलेल्या डान्सर्सकरिताच असणार आहे. तर दुसरीकडे अक्षयची पत्नी ट्विंकल करोना पिडीतांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. ट्विंकलने जवळपास 92 लाख रुपयांचा निधी जमवत त्यातून ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स दान करत आहे. 

एका वृत्तपत्राशी बोलताना गणेश आचार्य यांनी अक्षय कुमारच्या या मदतीबाबत भा्ष्य केलं. ते म्हणाले, "माझ्या वाढदिवशी अक्षय कुमारने मला तुला काय गिफ्ट देऊ अशी  विचारणा केली होती, तेव्हा मी त्यांना मला काहीच नकोय पण माझ्या बॅग्राऊंड डान्सर्सना मदतीची खुप गरज आहे. अक्षय खुप दयाळू आहे त्याने या मदतीसाठी लगेच होकार दिला."

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive