हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता अभिनेता पर्ल वी पुरीला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अभिनेता पर्लवर (POSCO) ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पर्लला वसई कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. शिवाय त्याला अजून बेल मिळाली नसल्याचं समोर येत आहे.
मात्र पर्लच्या समर्थनार्थ मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार पुढे येत असल्याचं चित्र दिसतय. अनेक कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पर्ल हा चांगला माणूस असल्याचं सांगीतलं आहे. एकता कपूर, करिश्मा टन्ना, जास्मिन भसीन, निया शर्मा, इशिता दत्ता यासह अनेक कलाकार त्याचं समर्थन करताना दिसत आहेत. हिंदीसह मराठीतील लोकप्रिय कलाकार अंकित मोहनही आता पर्लचं समर्थन करताना दिसतोय.
अंकित मोहनने नुकताच पर्लसोबतचा फोटो शेयर करत तो एक चांगला मनुष्य असल्याचं सांगीतलय. अंकितने पर्लसोबत काम केलय, त्यामुळे पर्ल हा कसा आहे हे तो जाणून आहे. म्हणूनच त्याने मित्राच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे.
अंकित या पोस्टमध्ये लिहीतो की, "कृपया करून कोणत्याही निष्कर्षावर जाऊ नका, हे खूप संवेदनशील प्रकरण आहे. त्याच्यासोबत काम केल्याने आम्हाला माहिती आहे की तो एक चांगला मा आहे. सत्याचा विजय होईल."
पर्लसोबत काम केलेले त्याचे सहकलाकार, टेलिव्हिजन क्षेत्रातील कलाकार, त्याचे मित्रमंडळी त्याच्या बाजूने उभं असल्याचं चित्र पाहायला मिळतय. तेव्हा या प्रकरणातून पर्लची सुटका होईल का ? या प्रकरणाला पुढे काय वळण मिळेल हे समोर येईलच.