By  
on  

बंगाल निवडणुकीतील प्रक्षोभक भाषणासाठी वाढदिवसादिवशीच मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी

वाढदिवसादिवशीच मिथुन चक्रवर्ती यांच्यावर पोलिस चौकशीला सामोरं जाण्याचा प्रसंग निर्माण झाला आहे. उत्तरी कोलकातामधील माणिकताळा पोलिस स्टेशनच्या अधिका-यांनी मिथुन यांची चौकशी केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दरम्य़ान, मिथुन यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचे आरोप लावत मानिकतल्ला पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

 

 

यावेळी प्रचारसभेत ‘‘मारबो एकहने लाश पोरबे शोशाने’ (तुमचा खात्मा केल्यास मृतदेह स्मशानात जातील) आणि ‘ एक छोबोले चाबी’ (सर्पदंशानंच तुम्ही छायाचित्रात कैद व्हाल) अशी वक्तव्य केली, ज्यामुळंच राज्यात निवडणुकांनंतर हिंसा उसळली असं या तक्रारीत म्हटलं आहे. निवडणुकींच्या निकालानंतर मिथुन यांनी आपल्यावरील आरोपांच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive