By  
on  

पाहा Video : दिलीप कुमार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जुहू स्मशानभूमीत पोहोचले बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक

बॉलीवुडचे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांना अखेर शेवटचा निरोप देण्यात आला. जुहू येथील स्मशानभूमीत तोफांची सलामी देत शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी दिलीप कुमार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन तिथे पोहोचले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ नुकतेच समोर आले आहेत. 

 

यावेळी स्मशानभूमीच्या बाहेर चाहते आणि मिडीयाची एकच गर्दी पाहायला मिळाली. याशिवाय सकाळी दिलीप कुमार यांच्या निधनाचं वृत्त समोर येताच अनेक कलाकार आणि राजकारणी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिलीप कुमार यांच्या राहत्या घरी पोहोचले होते. धर्मेंद्र, शाहरुख खान, रणबीर कपूर, अनुपम खेर, जॉनी लिव्हर यांच्यासह अनेक कलाकारांनी दिलीप कुमार यांचं अंत्यदर्शन घेतलं. 

 

दिलीप कुमार यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive