'देवदास'ला 19 वर्षे पूर्ण, 'चंद्रमुखी' साकारणाऱ्या माधुरीने शेयर केली खास आठवण

By  
on  

संजय लीला भंसाळी यांच्या 'देवदास' सिनेमाला नुकतीच 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या सिनेमाशी जोडले गेलेले कलाकार आणि टीम या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देत आहे. या सिनेमात चंद्रमुखीच्या भूमिकेत झळकलेल्या माधुरी दीक्षितने या सिनेमाची आठवण शेयर करत सिनेमाच्या सेटवरील खास फोटोही शेयर केला आहे.

माधुरी या पोस्टमध्ये लिहीते की, "देवदासच्या सेटवरील काही चांगल्या आणि आनंदी आठवणींना उजाळा देत आहे. 19 वर्षांनंतरही हे सर्व खूप ताजं वाटतय. धन्यवाद संजय हे शेयर करण्यासाठी. हे कामय स्मरणात राहील. आमची दिलीप कुमार यांना श्रद्धांजली. देवदासप्रमाणे तुम्ही देखली कायम स्मरणात जगत राहाल."

संजय लीला भंसाळी यांच्यासह माधुरी आणि इतर कलाकारांनी देवदासच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यासह 1955 मध्ये देवदास साकारणारे बॉलीवुडचे लोकप्रिय नायक दिलीप कुमार यांनाही श्रद्धांजली वाहिली आहे. 

 

12 जुलै 2002 रोजी 'देवदास' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याआधी 23 मे 2002 ला हा सिनेमा कान महोत्सवात दाखवण्यात आला होता. या सिनेमात किंग खान शाहरुख हा देवदास मुखर्जी, ऐश्वर्या राय बच्चन ही पार्वती उर्फ पारो तर माधुरी दीक्षित ही चंद्रमुखीच्या भूमिकेत झळकली होती. त्यावेळी बनलेली ही सगळ्यात महागडी फिल्म होती. सिनेमातील कलाकार, संगीत, कथा, संवाद या सगळ्यालाच प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. शिवाय या सिनेमावर राष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कारांचा वर्षाव झालाय. 

Recommended

Loading...
Share