Video : क्रिती सेनॉनच्या ‘मीमी’चा आला ट्रेलर, सई ताम्हणकरचासुध्दा दिसला जबरदस्त अंदाज

By  
on  

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या  ‘मीमी’ या सिनेमाची अनेक दिवसांपासून चर्चा रंगली होती. क्रिती, पंकज त्रिपाठी यांच्यासोबतच आपली मराठमोळी स्टार सई ताम्हणकरसुध्दा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. ‘मीमी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सईने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

मीमी सिनेमाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. समृध्दी पोरे दिग्दर्शित आणि उर्मिला कोठारे अभिनीत मला आई व्हायचंय या मराठी सिनेमाचा हा अधिकृत रिमेक आहे.  

मीमीच्या ट्रेलरमध्ये क्रितीला एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट आई होण्यासाठी विचारण्यात येते. या साठी तिला २० लाख रुपये देण्यात येणार असतात. मात्र, काही महिन्यांनंतर ते जोडपं त्यांना ते बाळ नको असे सांगतात. मात्र, क्रिती गर्भपात करण्यासाठी तयार नसते. त्यानंतर पंकज त्रिपाठी त्या बाळाचे वडील आहेत, असं खोटं क्रिती तिच्या आई-वडिलांना सांगते आणि एकच धम्माल उडते. तर सई ताम्हणकर क्रितीच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

 

 

हा चित्रपट ३० जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

Recommended

Loading...
Share