By  
on  

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीचा ‘सुपर डान्सर-४’ मधून काढता पाय

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी करण्याच्या आणि ते एप्सवर प्रदर्शित करण्याच्या  आरोपाखाली अटक करण्यात आली. या घटनेमुळे सिनेविश्वात आणि अवघ्या बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडालीय. या प्रकरणात राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्याच आलीय,  राजच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून आता याचा परिणाम शिल्पाच्या कामावर होत असल्याच दिसून येतंय.

गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर-४’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. मात्र पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पाने शूटिंग करणं रद्द केलंय. मंगळवारी ‘सुपर डान्सर ४’ चं मुंबईत शूटिंग पार पडणार होतं. मात्र राज कुंद्राला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी शूटिंगला पोहचली नाही.

मंगळवारी २० जुलैला मुंबईत या शोच्या एपिसोडचं शूटिंग पार पडणार होतं. पण शिल्पा शुटिंगला उपस्थित न राहिल्याने गेस्ट जज करिश्मा कपूर आणि उर्वरित परिक्षकांसह हे चित्रिकरण पार पडलं.

सूत्रांच्या माहितीनुसार शोच्या टीमने आता करिश्मा कपूरलाच पुढील दोन दिवसांसाठी लॉक केलं आहे. एवढचं नाही तर शिल्पा जर शोमध्ये पुन्हा आली नाही तर करिश्मा कपूर शिल्पाच्या जागी रिल्पेस होऊ शकते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive