By  
on  

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच झाली व्यक्त

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्न फिल्म्सच्या निर्मिती प्रकरणामध्ये बेड्या ठोकल्या. त्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात बऱ्याच चर्चा झाल्या. तिचासुध्दा यात सहभाग आहे का यांसंदर्भातसुध्दा बोललं गेलं.  याप्रकरणामुळे शिल्पाच्या कामांवरही परिणाम होताना दिसून येत आहे. सुपर डान्सर -४  या डान्स शोचं ती परिक्षण करत होती. पण ती आता त्यासाठीसुध्दा गैरहजर. तसंच ती खुप वर्षांनी हंगामा -२ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करतेय. पण त्याच्या प्रोमोशनच्या इव्हेंटमध्येही ती सहभागी होऊ शकत नाहीय. 

मात्र आता राज यांना अटक झाल्यानंतर शिल्पा पहिल्यांदाच इन्स्ताग्रामवरुन व्यक्त झाल्याचं पाहायला मिळतंय. यापूर्वी ती प्रसिध्दी माध्यमांसमोर आलेली नाही. पण  गुरुवारी रात्री तिने एक इन्स्ताग्राम स्टोरी पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये तिने एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केलाय. यामध्ये जेम्स थर्बर या लेखाचं एक वाक्य दिसून येत आहे. “रागात मागे वळून पाहू नका किंवा घाबरुन येणाऱ्या काळाकडे पाहू नका उलट जागृक राहून याकडे पाहा,” असा या वाक्याचा अर्थ आहे.

 

 

ज्या लोकांनी आपल्याला दुखावलं आहे, ज्यांनी आपल्याला निराशेच्या गर्तेत ढकललं, ज्यांच्यामुळे आपल्याला दुर्देव असल्यासारखं वाटलं त्या लोकांच्या भूतकाळाकडे आपण रागाने वळून पाहतो. भविष्याकडे पाहतानाही आपण माझी नोकरी जाईल, मला एखादा आजार होईल किंवा जवळच्या एका व्यक्तीचे निधन होईल या भीतीमध्ये जगत असतो. आपण सध्याच्या वर्तमानामध्ये जगायला शिकलं पाहिजे. काय घडलं आणि काय घडणार याबद्दल विचार करण्याऐवजी आहे त्या वास्तवात जगलं पाहिजे, असा या पोस्टमधील लेखकाच्या ओळींचा अर्थ आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive