दिग्दर्शक, निर्माता करण जोहर 'बिग बॉस ओटीटी' शो करणार होस्ट

By  
on  

 नुकत्याच जाहीर झालेल्या "बिग बॉस ओटीटी" च्या लाँच नंतर , बिग बॉस चाहत्यांना करमणूक, खळबळ आणि नाटकांची अतिरिक्त मेगा ट्रीट देण्यास सज्ज झाला आहे.  आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे की, भारतातील सर्वात मोठे दिग्दर्शक, निर्माता आणि आयकॉन करण जोहर ब्लॉकबस्टर होस्ट म्हणून बिग बॉस ओटीटीमध्ये सामील झाले आहेत.

 वूटवर चालणाऱ्या सहा आठवड्यांच्या या शोसाठी करण जोहर बिग बॉस ओटीटीच्या नाटक आणि मेलोड्रामाचे अँकरिंग करणार आहे.  अभूतपूर्व पोहोच, व्यस्तता आणि परस्परसंवादासह 8 ऑगस्ट 2021 रोजी बिग बॉस ओटीटी प्रेक्षकांना स्पर्धकांच्या प्रवासात स्वतःला गुंग करण्यास मदत करेल.  बिग बॉसच्या चाहत्यांना प्रथमच सर्व ड्रामा आणि अ‍ॅक्शन २४ तास घरातून थेट पाहायला मिळतील.  याशिवाय बिग बॉसच्या चाहत्यांना वूट वर १ तासांचा भाग दाखवण्यात येईल, या व्यतिरिक्त दर्शकांना एक्सक्लूसिव कट्स,  २४ तास कंटेंट  आणि संपूर्ण इंटरएक्टिव्ह आवृत्ती पाहण्याची संधी देखील मिळणार आहे.  डिजिटल एक्सक्लुझिव्ह पूर्ण झाल्यानंतर शो बिग बॉसच्या सीझन 15 च्या लाँचिंगसह कलर्सवर अखंडपणे पुढे जाईल.
 
  करणची स्पष्ट, वेगवान, चमकदार आणि गतिशील शैली बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांकडे  प्रेक्षकांना जवळीक आणि व्यक्तिगत करण्यास मदत करेल. करणकडे  एकाच वेळी असणारा गमतीशीर  आणि समंजस हा गुण ,  प्रेक्षकांना हसवेल आणि अंतर्मुख करेल तसेच बिग बॉस घरामध्ये बंद असलेल्या स्पर्धकांसाठी बाहेरील जगासाठी करण बाहेरची खिडकी  असेल.

  व्हूटवर बिग बॉस ओटीटी होस्टच्या त्याच्या नव्या भूमिकेविषयी करण जोहर म्हणाला, मी आणि माझी आई बिग बॉसचे प्रचंड चाहते आहोत आणि एक दिवस ही आम्ही शो चुकवत नाही.  एक प्रेक्षक म्हणून हा नाटकिय ड्रामा माझे खूप मनोरंजन करते.  अनेक दशकांपासून मी बर्‍याच कार्यक्रमांचे होस्टिंग करण्याचा  आनंद घेतला आहे आणि त्यात बिग बॉस ओटीटी  नक्कीच अव्वल असेल.  हे माझ्या आईचे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे.  बिग बॉस ओटीटी निःसंशयपणे जास्त खळबळजनक आणि नाट्यमय असेल.  मला आशा आहे की मी प्रेक्षकांच्या आणि माझ्या मित्रांच्या अपेक्षेवर खरा उतरेन, तसेच माझ्या स्वत: च्या स्टाईलमध्ये स्पर्धकांसमवेत 'वीकेंड का वार' मजेदार बनवून,  मनोरंजनाच्या पातळीचा स्थर अजून उंचावेन.  त्यासाठी प्रतीक्षा करा! "

   बिग बॉस घराच्या सर्व मेलोड्रामा रसिकांना आता ओटीटीवर अनुभवता येणार आहे. पहा  'बिग बॉस ओटीटी के मझे लूट' 8 ऑगस्टपासून फक्त वूटवर .

Recommended

Loading...
Share