By  
on  

अक्षयकुमार ने रक्षाबंधनचं मुंबईतील शेड्युल केलं पुर्ण, शेअर केला हा खास फोटो

सुपरस्टार अक्षय कुमारने रक्षाबंधन सिनेमाचं मुंबईतील शेड्युल संपवलं आहे. यानंतर अक्षयने BTS फोटो शेअर केले आहेत. अक्षय आणि भूमी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सहेजमिन कौर, दिपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अभिनेत्री अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत. मागील वर्षी अक्षयने रक्षाबंधनला या सिनेमाची घोषणा केली होती. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

यासोबतच मोनोक्रोम फोटोही शेअर केला आहे. अक्षय या कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘चांदणी चौकच्या गल्लीत असणं आतापासूनच मिस करतो आहे. कारण म्हणजे हा सेट अगदी हुबेहुब बनला आहे. सुमीत बसुने हा सेट जसाच्या तसा बनला आहे. भूमी आपल्या टॅलेंटने संतुलन ठेवल्याप्रकरणी आभार. आनंद सर मी एक आणखी उत्तम कलाकार बनूनच सेट सोडतो आहे. रक्षाबंधनसाठी अक्षयने त्याचं वजन वाढवलं आहे. हिमांशु शर्मा आणि कनिका ढिल्लन लिखित , आनंद एल राय द्वारा दिग्दर्शित, रक्षाबंधन ही फिल्म केप ऑफ गुड फिल्म्स असोसिएशन सह कलर यलो प्रॉडक्शन ची फिल्म आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive