By  
on  

ही नेमकी लारा दत्ताच आहे ना ....विश्वास बसत नाही, नेटकरी झाले हैराण

पहिल्या लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये परदेशात चित्रित झालेला पहिला बॉलिवूड सिनेमा बोल बॉटमचा ट्रेलर अखेर नुकताच दिल्लीत एका सोहळ्यात प्रदर्शित झाला. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. पण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि चित्रपटातील लारा दत्ताच्या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. लाराने यात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

तिचं ऑनस्क्रीन ट्रान्सफॉर्मेशन पाहिल्यानंतर नेटकरी हैराण झाले आहेत, तिचा लुक पाहून सर्वच थक्क आहेत. ती हुबेहूब इंदिराजींसारखीच दिसतेय. खुपच परफेक्ट असा मेकअप करुन ही किमया साधण्यात आली आहे. 

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील फक्त अक्षयच्या भूमिकेची नाही तर लारा दत्ताच्या भूमिकेचीही स्तुती करण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर लारादत्ता हे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.

बेलबॉटम हा सिनेमा 80 च्या दशकांती ल कथानकावर आधारित आहे. या सिनेमात अक्षय एका गुप्तहेराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हायजॅक झालेल्या एका भारतीय विमानातील 212 प्रवाशांच्या सुटकेसाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive