By  
on  

शिल्पा शेट्टी शोवर अजुनही परतली नाही, 'सुपर डान्सर'च्या मंचावर पाहुणी आली सोनाली बेंद्रे

सुपर डान्सर सत्र 4 च्या आगामी वीकएंडच्या भागात बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री मौशमी चटर्जी आणि सुंदर व देखणी सोनाली बेंद्रे हजर असणार आहेत. या दोन्ही अभिनेत्रींच्या योगदानाचा गौरव करताना स्पर्धक डान्सर्स आपल्या अप्रतिम परफॉर्मन्सने परीक्षकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करताना दिसतील.
 
स्पर्धक आणि अंशिका आणि तिचा सुपर गुरु आर्यन यांनी सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांसाठी एक सर्प्राइज आणले होते. त्यांनी ‘सरफरोश’ चित्रपटातील ‘इस दीवाने लडके को’ गाण्यावर परफॉर्म करून सगळे परीक्षक आणि अतिथी कलाकार यांच्याकडून भरभरून दाद मिळवली.
 
त्यांच्या परफॉर्मन्सचे कौतुक करताना सोनाली बेंद्रे म्हणाली, “वाहवा, अप्रतिम कामगिरी, आणि जबरदस्त कोरिओग्राफी! हे गाणे एखाद्या दृश्यासारखे होते, तुम्ही दोघांनी त्याला डान्सची जोड दिलीत. आता ते गाणे अधिक सुंदर दिसू लागले आहे. मला तर असे वाटले की, जणू हे एखादे दृश्य सुरू आहे आणि तुम्ही दोघे त्यात आपापले संवाद बोलत आहात.”
 
तिने या गाण्याविषयीचा एक किस्साही सांगितला. ती  म्हणाली, “हे गाणे चित्रित करताना आम्ही ते एका दृश्याप्रमाणेच परफॉर्म केले होते. गाण्याचा ठेका नव्हता पण आमीर खान हा अचूकतेचा भोक्ता असल्याने त्याने अप्रतिम काम केले. त्यामुळे ते गाणे असे वाटले की, जणू आम्ही संवाद बोलत आहोत आणि मागे संगीत सुरू आहे.”

 


 
हा परफॉर्मन्स पाहून मोहित झालेली गीता कपूर म्हणाली, “ही संपूर्ण कोरिओग्राफी फारच छान आणि मनाला आल्हाद देणारी होती. तुमच्या लिफ्ट्स मध्ये तुम्ही एकमेकांबद्दल जो विश्वास दाखवलात, तो पाहून तर मी चक्रावून गेले आहे. अंशिका, तू दिवसेंदिवस, आपल्या प्रत्येक परफॉर्मन्सबरोबर अधिकाधिक सुंदर होत चालली आहेस. मी तर म्हणेन की हा एक स्टुपेंडो फँटाब्युलसली फँटास्टिकली मॅजिकल परफॉर्मन्स होता.”
 
अनुराग बसूचे देखील असेच काहीसे म्हणणे होते. तो म्हणाला, “ही अंशिका आपल्या डान्समध्ये इतकी पक्की झाली आहे, की तिच्यावरून नजर हटतच नाही. ती खूप अचूक नाचते आणि आर्यन, तुझी कोरिओग्राफी अफलातून होती आणि तू ज्या प्रकारे या अॅक्टची सुंदर विभागणी केलीस ते कौतुकास्पद होते.”
 
या परफॉर्मन्सनंतर अंशिकाला तिचे सगळे शिक्षक आणि प्राचार्य यांच्याकडून एका व्हिडिओ कॉलच्या रूपात सर्प्राइज मिळाले. त्या सर्वांना अंशिकाचा खूप अभिमान वाटत होता आणि त्यांनी तिच्याबद्दल छान छान उद्गार काढले. “अंशिका आमच्या शाळेतली स्टार कोरिओग्राफर आहे आणि जेव्हा शाळेत एखादा कार्यक्रम असतो, तेव्हा सगळ्यांच्या नजरा अंशिकाच्या परफॉर्मन्सवरच असतात.” प्राचार्यांनी कौतुकोद्गार काढत म्हटले, “अंशिका डान्सिंगमध्ये जितकी प्रतिभावान आहे, तितकीच अभ्यासात आणि खेळातही पुढे असते. ती आमच्या शाळेत असल्याचा आम्हा सर्वांनाच खूप अभिमान आहे आणि आपली कला अभिव्यक्त करण्यासाठी तिला इतका मोठा मंच मिळवून दिल्याबद्दल सुपर डान्सर सत्र 4 चे खूप खूप आभार.”

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive