By  
on  

‘अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील बंगल्यात बाँब आहे’............. निवावी फोनमुळे खळबळ

मुंबई पोलिसांना शुक्रवारी एक निवावी फोन आला. या फोन मुळे चांगलीच खळबळ माजली. या फोनवरील व्यक्तीने दादर, भायखळा, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील बंगल्यामध्ये बाँब ठेवल्याचं सांगितलं. 

 

या नंतर पोलिसांनी वरील ठिकाणी शोध घेतला पण  काही हाती लागलं नसल्याचं समोर आलं.  तपासादरम्यान दोन व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. राजू कांगणे आणि रमेश शिरसाट अशी या दोन व्यक्तींची नावं आहेत. दारुच्या नशेत दोघांनी हा फोन केल्याचं समोर आलं. अमिताभ यांच्या घराची यावेळी कसून तपासणी केली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive