By  
on  

'प्रतिज्ञा' फेम ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचं निधन

बॉलीवूड आणि टीव्ही जगतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. 'प्रतिज्ञा' फेम ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचं ८ ऑग्सटो रोजी निधन झालं. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  ते ६३ वर्षांचे होते.  मन या लोकप्रिय मालिकेला त्यांनी दिलेला आवाज आणि प्रतिज्ञा या मालिकेमधील ठाकुर सज्जन सिंह या दोन गोष्टींमुळे अनुपम यांनी मनोरंजन विश्वात आपलं खास स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

प्रतिज्ञा या मालिकेमुळे अनुपम घराघरात पोहचले. या मालिकेत त्यांनी ठाकुर सज्जन सिंह ही भूमिका साकारली होती. प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी सज्जन सिंहची भूमिका साकारण्यासाठी हो का याचं कारण अनुपम यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ते म्हणाले की, प्रेक्षकांना हे पात्र खूप आवडतं आणि चाहत्यांना त्यांना निराश करायचं नव्हतं म्हणून अनुपम यांनी ही भूमिका स्वीकारली होती. ते म्हणाले होते की, 'मृत्युशी युद्ध सुरू होतं. तिथे जिंकून आलो. आता प्रतिज्ञा मालिकेच्या माध्यमातून मला पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे.'

अनुपम यांनी दस्तक, हजार चौरासी की मां, दुश्मन, सत्या, दिल से, जख्म, संघर्ष, लगान, नायक, शक्ति, पाप, जिज्ञासा, राज, वेलडन, अब्बा, वॉन्टेड, कजरारे और मुन्ना माइकल सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive