By  
on  

‘सुर्यवंशी’च्या रिलीजबाबत अक्षय कुमार म्हणतो, ‘ते रोहीत शेट्टी आणि देवालाच ठावूक’

रोहीत शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा आगामी सिनेमा म्हणजे सुर्यवंशी. या सिनेमाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. गेल्या वर्षीच्या मार्चपासून या सिनेमाच्या रिलीजबाबत अनेक अंदाज बांधले गेले आहेत. पण बेल बॉटमच्या प्रमोशनच्या दरम्यान अक्षय सुर्यवंशीच्या रिलीजबाबत बोलताना म्हणतो, ‘त्याबाबत रोहीत शेट्टी आणि देवालाच ठावूक’ आहे. 

 

दिवाळी 2021च्या रिलीजबाबत अक्षय म्हणतो, ‘मलाही याची कल्पना नाही मी देखील फिंगर्स क्रॉस केले आहेत. सुर्यवंशी लवकर रिलीज होईल अशी मलाही आशा आहे. मी याला मोठ्या पडद्यावर पाहणं पसंत करेन.  या सिनेमात अक्षयसोबत कतरिना झळकणार आहे. या सिनेमात अक्षय एक स्टायलिश कॉप साकारताना दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive