By  
on  

रितेश देशमुखचा नवा चित्रपट ‘प्लॅन ए प्लॅन बी’ नेटफ्लिक्सवर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हिंदीत चमकणारा आपला मराठमोळा लाडका अभिनेता रितेश देशमुख ब-याच काळानंतर एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याची या सिनेमाद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दणक्यात एन्ट्री होतेय. या चित्रपटातील अभिनेता रितेश देशमुखचा फर्स्ट लूक नुकताच समोप आला आहे. 

अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचा हा फर्स्ट लूक शेअर केलाय.या फोटोमध्ये तो मुंबईतल्या एका कुटूंब न्यायालयाच्या आवारात उभा असलेला दिसून येतोय. तसंच ‘नुकतंच घटस्फोटीत आणि सुखी’ असं लिहिलेली एक पाटी त्याने हातात पकडलेली दिसून येतेय. तर त्याने शेअर केलेल्या आणखी दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्यासमोर अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील दिसून येतेय. त्यामूळे या चित्रपटाच्या कहाणीबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

रितेश आणि तमन्ना भाटिया व्यतिरिक्त अभिनेत्री पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला देखील या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 190 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होईल. ‘वीरे दी वेडिंग’ सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे शशांक घोष यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळलीय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive