By  
on  

पैशालाही महाग झाली आहे सलमानची ही अभिनेत्री, मागितली मदत

सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात झळकलेल्या ज्येष्ठ  अभिनेत्री सुनीता शिरोळे सध्या आर्थिक अडचणीतून जात आहेत. 85 वर्षीय या अभिनेत्रीला प्रकृतीच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सध्या अस्वास्थ्यामुळे त्या काम करण्यास असमर्थ आहेत. त्यांनी केलेल्या खुलासामध्ये त्या म्हणतात की त्या पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या. पण त्या भाडं देऊ शकल्या नव्हत्या.

 त्यावेळी सिंटाने मदत केली आणि अभिनेत्री नुपुर अलंकारला मदतीसाठी पाठवलं होतं.’ यावेळी सुनीता म्हणतात, ‘ मी काम सुरु करु इच्छित आहे. कारण मला पैशाची गरज आहे. पण माझी अवस्था वाईट आहे. मला हे देखील ठावूक नाही की मी पुन्हा चालू शकेन की नाही ते. तो पर्यंततरी मला पैशाची मदत मिळायला हवी.’

Recommended

PeepingMoon Exclusive