By  
on  

‘मर्द को दर्द नही होता’ म्हणत अभिषेक बच्चनने शेअर केला खास फोटो

अभिनेता अभिषेक बच्चन अलीकडे चेन्नईमधील शुटिंग दरम्यान जखमी झाला. त्यासाठी त्याला लीलावती हॉस्पिट्लमध्ये दाखल केलं गेलं होतं. अभिषेकने पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिषेक मास्क घालून एका खुर्चीवर बसल्याचं दिसतंय. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर बेल्ट आहे.

 

 

हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “मागच्या बुधवारी चेन्नईमध्ये माझ्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरु असताना एक विचित्र अपघातात माझ्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं. यासाठी सर्जरी करणं गरजेचं होतं. त्यामुळे मी लगेचच मुंबईला आलो. सर्जरी झाली आहे. सर्व काही पॅच अप आणि कास्टही झालंय. त्यामुळे पुढील शुटिंगसाठी चेन्नईला जाण्यासाठी तयार आहे. जसं की म्हणतात शो मस्ट गो ऑन… आणि जसं माझ्या वडिलांनी म्हंटलं आहे, मर्द को दर्द नही होता’.

Recommended

PeepingMoon Exclusive