By  
on  

‘चूक केली पण....' शिल्पा शेट्टीची ती पोस्ट व्हायरल

पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी बिझनेसमन आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक केल्यानंर शिल्पा शेट्टीसुध्दा बरीच हादरली होती. आता हळूहळू शिल्पा यातून सावरतेय. ती पुन्हा आपल्या शूटींगच्या कामांनासुध्दा हळूहळू रुजू होतेय.

अलिकडेच ती सुपर डान्सर- 4 च्या सेटवर परतली होती, सोशल मिडीयावरसुध्दा शिल्पा या काळात अनेक संवेदनशील आणि भावूक करणारे मेसेजस चाहत्यांपर्यंत पोहचवते. यावेळी तिच्याकडून चूक झाली आहे असे तिने एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे.

 

 

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून हा फोटो शेअर केला आहे. शिल्पाने शेअर केलेला हा फोटो एका पुस्तकातला आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की ‘केलेल्या चूकीची भरपाई आपल्याला आयुष्यभर करावी लागते,’ अशा आशयाची ओळ त्यात दिसत आहे. ही ओळ  सोफिआ लॉरेनची आहे. या पोस्टमधील आणखी एका ओळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मी चूक करणार, मी त्या चूकीतून शिकणार आणि स्वत:ला माफ करणार,’ अशी ती ओळ आहे. ‘चूक केली पण ठीक आहे,’ असे स्टिकर शिल्पाने हा फोटो शेअर करत दिले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive